जिल्हा परिषदेच्या शिक्षिका मोहिनी रामसिंग पाटील यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
शिक्षण समाचार ; – चांगदेवांचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानदेवांनी चक्क भिंतीचा वापर करून प्रवास केल्याचा उल्लेख पोथ्यांमध्ये आढळतो वर्तमानकाळात ज्ञानाचे धडे देण्यासाठी जिल्हापरिषदेच्या शिक्षिकेने ज्ञानरचनावादानुसार वर्गाचे तळ व भिंतीवर स्वतःच्या हस्ताक्षरातून ज्ञानाचे धडे रंगवलेले आहेत आणि चक्क वर्गाच्या छतावर स्वतः सूर्यमाला तयार केली आहे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आकाशगंगेत गेल्याची अनुभूती त्या देत आहे शिक्षिकेने स्वखर्चाने रंगवलेल्या वर्गाच्या दाही दिशा ज्ञानाचे धडे देत आहे.

या उपक्रमशिल शिक्षिका धुळे जिल्हातील शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विखरण (देवाचे)येथील आहे मोहिनी पाटील यांनी स्वतःच्या कल्पनेने उपक्रम राबविला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानवृध्दीसाठी खुप फायदा होत आहे. वर्गाच्या रिकाम्या भिंतीचा,छताचा,तळाचा व बेंचचा खुबीने वापर करून घेतलेला असुन या सर्वांमुळे वर्गात शैक्षणिक वातावरणाची पुरेपूर निर्मीती घडून आलेली आहे. विद्यार्थी एखाद्या खेळात रमावेत तसे वर्गात व अभ्यासात रमतात.

विद्यार्थी हा सतत ज्ञानार्जनाचे काम करीत असतो.तो काहीना काही ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो मुलांच्या या शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी दिसेल ते वाचा हा उपक्रम घेतला आहे या मुळे मॅडमांचे मागिल सर्वच बॅचचे विद्यार्थी प्रगत आहे व विविध स्पर्धा परिक्षांमध्ये चमकत आहेत.या उपक्रमांची दखल या आधीचे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.बुवनेश्वरी मॅडम यांनी घेतली होती शाब्बास गुरुजी कार्यक्रमांतर्गत गौरवण्यात आले होते. नंतरचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.शुभम गुप्ता साहेब यांनी बा ला उपक्रमांअंतर्गत माॅडेल म्हणून जिल्ह्यातील अधिकारी व शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याने कौतुक होत आहे.
